भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला, त्या निमित्ताने आनंद व्यक्त करण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते, अशी पौराणिक कथा सांगितली आहे . या दिवशी दीपोत्सव करण्याची प्रथा राज्यातील अनेक ठिकाणी पाळली जाते. खासकरून शिवमंदिरांमध्ये दीपोत्सव करण्याचे प्रमाण अधिक आहे. आसमंत उजळवून टाकणारा हा दीपोत्सव मनालाही नवा तजेलाही देतो. श्री व्याघ्रेश्वर मंदीर येथे सालाबादप्रमाणे त्रिपुर प्रज्वलनाचा म्हणजेच या वर्षीचा *त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव, श्री व्याघ्रेश्वर मंदिर,मौजे,आसूद, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथे, गुरूवार दि.१८नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६.२५ वा. साजरा केला गेला....एसटीचा संप वरुणराजाची खपामर्जी असूनही आपण सर्व जण मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या साठी जय व्याघ्रेश्वर .... दापोलीतील आसूद येथील आपल्या श्री व्याघ्रेश्वर मंदिरातील त्रिपूर दीपोत्सवाबद्दल.... १९८२ साला पासून आपला श्री व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवार हा त्रिपूर दीपोत्सव साजरा करत आला आहे यंदाचे हे ४०वे वर्ष.... श्री व्याघ्रेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो त्यासाठी परिवाराची कार्यकारिणी आणि अनेक अन्य कार्यकर्ते हा त्रिपुर दीपोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होण्यासाठी झटत असतात. मंदिराचा सभामंडप भव्य असल्याने संपूर्ण परिसरात किमान हजार पणत्या लावल्या जातात. त्यासाठी जवळपास पाच लिटर तेल लागते. दुपारी अडीच-तीनपासूनच याची तयारी सुरू असते. त्रिपूर दीपोत्सवासाठीच्या पणत्या आधी काही काळ पाण्यात भिजवल्या जातात. भिजवलेल्या पणत्या न भिजवलेल्या पणत्यांपेक्षा जवळपास तीन तास अधिक तेवतात. पणत्या ठेवण्याच्या जागेवर रांगोळी काढली जाते आणि तीन चार इंचांच्या अंतरावर पणत्या स्वस्तिक ओम आकारात ठेवून त्यानंतर या ठेवलेल्या पणत्यांमध्ये तेल ओतले जाते आणि मग वाती घातल्या जातात. संध्याकाळी सहा वाजता मंदिरात श्री देव व्याघ्रेश्वराची पंचोपचार पूजा आरती केली जाते त्या नंतर दिपमाळेची ही पंचोपचार पूजा आरती केली जाते, ... त्यानंतर परिवारातील महिला वर्ग पणत्यांच्या ज्योती प्रज्ज्वलित करायला सुरुवात करतात त्यामुळे सारा परिसर उजळून निघतो. मोठमोठ्या रांगोळ्याही काढल्या जातात. आपला हा त्रिपूर दीपोत्सव भले चार तासांचा असेल पण पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. ते पाहायला उपस्थिती आवश्यकच... सायंकाळी त्रिपुर पूजन, आरती व रोषणाई झाल्यावर रात्री गप्पाष्टक ओळख परेड झाली ... आपल्या परिवाराच्या कार्यकारणी सदस्य श्री अजित (विनायक ) वैशंपायन ह्यांचा योगायोगाने वर्धापनदिनाच्या अधुनिक पद्धतीने केक आणून साजरा केला....त्यानंतर भक्तनिवासात अल्पोपहार .... आजच्या दिवशी कुठलाही उपास नसल्याने अल्पोपहार हा थोडा चमचमीत ठेवला जातो.. ह्या त्रिपूर दीपोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे एक/दोन नाही तर सहा कुटुंबातील नवीन सदस्यांनी उपस्थिती लावली होती, त्यामुळे आणखी मजा आली आणि त्यांनी पुढच्या महाशिवरात्री ला येण्याचे आश्वासन ही दिले आपले हे मंदिर वास्तू पुरातन असल्याने त्यामुळे त्याची योग्य ती काळजी घेतली जाते. त्रिपूर दीपोत्सवा आधी आणि नंतर एक/दोन दिवस परिसराची साफसफाई केली जाते....परिवाराचे कार्यकर्ते तसेच भाविकांच्या मदतीने हा त्रिपूर दीपोत्सव साजरा होतो.... यंदाच्या त्रिपूर दीपोत्सवाला कार्यकारिणीचे खंदेवीर अपरिहार्य कारणाने उपस्थित राहु शकले नाहीत... त्या मुळे काही त्रुटी जाणवली असेल तर क्षमस्व.... जय व्याघ्रेश्वर