श्री व्याघ्रेश्वर मंदिर व परिसराच्या जिर्णोद्धारास सुरुवात करण्यात आली आहे. आमचे आपणा सर्वांना नम्र आवाहन आहे की आपण जास्तीत जास्त देणगी देऊन या पवित्र कार्यास हातभार लावावा. हा जगन्नाथाचा रथ असून सर्वच भक्तांनी त्यास हातभार लावला तरच तो विना-सायास ओढला जाईल. ज्या भक्तांना या पवित्र कार्यास मदत करायची इच्छा असेल त्यांनी कार्यकारिणीतील सदस्य अथवा थेट अध्यक्षांशी संपर्क साधावा ही नम्र विनंती. कार्य व्हावे ही "श्रीं"ची ईच्छा आहे... बस आपला मदतीचा हात आम्हाला लाखमोलाचा आहे !!
देणगी देण्यासाठी खालील बँक खात्यात देणगी जमा केल्यास देणगीदाराने त्यांचे नाव व त्या संबंधीचे तपशील पोस्टाने अथवा संकेतस्थळावरील संपर्क/चौकशी अर्ज भरून पाठवावे, देणगीदाराला देणगीची रीतसर पावती पोस्टाने व इ - मेल द्वारा पाठवली जाईल.
आपण दिलेल्या देणगीवर Income Tax ची 80G सुविधा उपलब्ध आहे.
• मंदिराचा आहे तो ढाचा कायम ठेवून वरून स्लॅब टाकणे
• मंदिराच्या अंतर्भागातील लाकडी तक्तपोशीला संरक्षण देणे
• योगेश्वरी कलामंचाच्या (स्टेज) कडेला चार खोल्या बांधणे
• भोजन कक्ष ते दीपमाळ - कायमस्वरूपी मंडप घालणे
• मंदिर परिसर स्वच्छ करुन कडेने बसण्यासाठी कट्टे घालणे
• स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करणे व त्यांची संख्या वाढवणे
• मंदिर परिसरात फरशी बसवणे
• वेबसाईट अद्ययावत करून सतत अपडेटेड ठेवणे
• रेनवॉटर हार्वेस्टिंग करून पाण्याचा प्रश्न सोडवणे
• व्याघ्रेश्वराची स्मरणिका तयार करणे
• भक्तनिवास ते मंदिर - RCC साकवाचे काम करून घेणे.