व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवारातर्फे आसूद व पंचक्रोशीतील गावांतील सर्वसामान्यांसाठी योग शिबिर, वैद्यकीय शिबिर, नेत्रोपचार शिबिर, रक्तदान अशा सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले जाते. परिवारातील अर्ध्वयू एअर कोमोडोर (निवृत्त) श्रीपाद अ. रानडे यांचे उपक्रमातून, ग्रामसाक्षरता अभियान, वाचनालय, स्थानिक शाळेतील मुलांसाठी शिक्षणोपयोगी साहित्याचे वाटप इ. उपक्रम राबवले जातात. "व्रत सेवेचे - भक्तीचे - ज्ञानाचे" या परिवाराच्या बोधवाक्यानूसार त्यांची वाटचाल अविरत चालू आहे.
२०१७ मध्ये आसूद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला दूरदर्शन संच भेट दिला.
प्रत्येक वर्षी आपण शाळेतील मुलांसाठी त्यांच्या गरजेनुसार विचारपूर्वक वस्तुरूप मदत करत असतो.
आसूद येथील 1ली ते 7वी असलेल्या तुकड्या असलेल्या शाळेला न्यासाने 3 वर्षांपूर्वीच काळाची पावलं ओळखून छोट्या विद्यार्थ्यांना इ-लर्निंग मिळावे म्हणून एक स्मार्ट TV भेट दिला होता व त्याचवेळी न्यासाशी एकरूप झालेल्या कोंकण इन्फ्रा या कंपनीने प्रोजेक्टर प्रदान केला होता. शाळेतील धडाडीचे शिक्षक श्री गिम्हवणेकर सर यांनी मागील वर्षांपासून या गोष्टीचा विद्यार्थ्यांसाठी उत्तम उपयोग करून घेत शाळेतील विद्यार्थ्यांना इ-लर्निंग मध्ये रस निर्माण करून दिला.
शाळा पूर्णतः 'स्मार्ट शाळा' बनवण्यासाठी शाळेकडून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अजून एक स्मार्ट TV व प्रत्येक इयत्तेनुसार, शैक्षणिक साहित्याने परिपूर्ण असलेले पेन ड्राईव्ह मिळण्याबाबत ईच्छा व्यक्त केली. न्यासाने त्यास त्वरित प्रतिसाद देत, आसूद येथील शाळेला नुकताच अजून एक स्मार्ट TV व पेन ड्राईव्ह चा सेट संक्रांतीच्या मुहूर्तावर इ-तिळगुळ रुपात प्रदान केला आहे. दोन्ही वस्तू देताना न्यासाचे प्रतिनिधी श्री धनंजय रानडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना या इ-तिळगुळाचा सतत आस्वाद घेऊन उत्तम शिक्षण घ्या व आपल्या आसुदचे व तुमचे नाव सगळ्या जगाला माहिती होईल असे स्वतःला घडवा असा संदेश दिला.