९८२२२ ९५६१० / ०२० - २५४४ ०३६२
भक्तनिवास

न्यासाचे भक्तनिवास, मौजे आसूद, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे अतिशय निसर्गरम्य परिसरात असून भक्तनिवासात तळमजल्यावर चार निवासी खोल्या, स्वयंपाकघर व टी. व्ही. हॉल असून पहिल्या मजल्यावर ५० ते १०० लोक झोपू शकतील एवढे मोठे शयनकक्ष आहे. येथे भक्तांच्या निवासाची नाममात्र देणगी शुल्क घेऊन उत्तम सोय केली जाते व शुद्ध शाकाहारी भोजन, चहा - कॉफी नाष्टा इ. नाममात्र शुल्कात उपलब्ध केले जाते.
जुन्या भक्तनिवासासोबत नवीन दिमाखदार "शिवालय" सुद्धा भक्तांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. आपल्या परिवारातील श्री. अजित रानडे, श्री. राजेंद्र वैशंपायन, डॉ. श्री. विष्णू रानडे व कै. विश्वनाथ जोशी यांच्या बहुमोल मदतीतून २०१३ - १४ मध्ये 'शिवालय' उभे राहिले. यामध्ये self Contained चार Suits आहेत. त्यातील दोन वातानुकुलीत (Ac) आहेत. वरच्या मजल्यावर २५ - ३० लोक झोपू शकतील एवढे शयनकक्ष, स्नानगृह - शौचालयासहित आहे.
समोर सुंदर lawn व वेगवेगळी झाडे लावलेली आहेत. या खोल्यांमध्ये सोलर सिस्टीममुळे गरम पाण्याचीही सोय आहे. उरलेले Suits (AC) वातानुकुलीतकरण्यासाठी आपण मदत करू शकता.


देणगी प्रकार


  • 1. भक्तनिवास

  • 2. मंदिर व परिसर जिर्णोद्धार

  • 3. लघुरुद्र/ महारुद्र

बँक डिटेल्स


Central Bank of India, Deccan Gymkhana branch, Pune.
SB A/C No. 1014330094, IFSC : CBIN0280655
State Bank of India, Dapoli Branch, Dist. Ratnagiri.
SB A/C No. 11325447697, IFSC : SBIN0001047