श्री क्षेत्र व्याघ्रेश्वर :
गाथा कुलस्वामीची हिंदू वेद व पुराणात, नित्य पूजा-कर्मात "कुलस्वामी" उपासनेला एक अनन्यसाधारण महत्व दिले आहे. कुलस्वामी या शब्दातच त्याच्या व्युत्पत्तीचा बोध होतो... कुळाचा स्वामी अर्थात मूळ आराध्य दैवत तो "कुलस्वामी". "कुळाचा स्वामी" निश्चितीला देखील काही आधार दिसतो.. हिंदू धर्मातील जवळपास प्रत्येक ज्ञातीने "कुलदैवत" ही संकल्पना स्वीकारली / अंगिकारलेली दिसते. काही ज्ञातीत कुलदैवत म्हणून फक्त देव (भगवान विष्णू, शंकर, खंडोबा, विठ्ठल, काळभैरव इ.) तर काही ज्ञातीत फक्त देवी (अंबाबाई, भवानी, मरीआई, यलम्मा, शांतादुर्गा इ.) आहेत. महाराष्ट्रातील चित्पावन ज्ञातीत मात्र कुलदैवतात देवाबरोबरच देवीचाही समावेश आहे.
चित्पावन ज्ञाती ही मूळ महाराष्ट्रातील किंवा ते स्थलांतरीत झालेले आहेत या विषयी बरीच मत-मतांतरे आहेत. सातवाहन कालीन एका उपलब्ध शिलालेखानूसार त्या काळात चित्पावन ब्राह्मण यज्ञकर्मा साठी उत्तरेतून गुहागर जवळ आल्याचा उल्लेख सापडतो.. तर पारंपारीक कथेनुसार श्री. परशुरामाने, बाणाने समुद्राचे पाणी हटवून तयार केलेल्या "अपरान्त भूमी" त म्हणजेच कोकणभूमीत खास यज्ञकर्मासाठी १३ प्रेतांना संजीवन करुन त्यांचे "चित्त पावन" करुन घेतले ते "चित्पावन" असे मानतात. एका संशोधकाने चित्पावन मंडळींच्या कवटीचा आकार व रचनेवरुन ते मध्य-पुर्वेतून जहाजामधून स्थलांतरीत झाले असावे असे अनुमान काढले आहे. एक मात्र नक्की की एतद्देशीय लोकांपेक्षा रुप-रंग, बांधा, डोळ्यांचा घारा रंग, कुशाग्र बुद्धी यामूळे त्यांचे वेगळेपण उठून दिसते. चित्पावन ज्ञाती ही मूलत: शैव असून (काही चित्पावन कुलांचा कुलदैवत लक्ष्मी-केशव, केशवराज इ. आहे.) बऱ्याच कुटुंबांची कुलदेवता मात्र बीड जिल्ह्यातील अंब्याची योगेश्वरी आहे... असो. अशा चित्पावन ज्ञातीतील रानडे, मनोहर, फफे, कंद्रप, आखवे (भारद्वाज गोत्र), वैशंपायन, सहस्त्रबुद्धे (नित्युंदन गोत्र), धारप, विद्वांस, मराठे (कपि गोत्र), केतकर (गार्ग्य गोत्र) व फक्त काश्यप गोत्री जोशी उपनावांचा कुलस्वामी, श्री क्षेत्र आसूद येथील "श्री. देव व्याघ्रेश्वर" आहे. श्री. क्षेत्र आसूद हे कोकणातील थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात असून दापोली पासून ८ कि. मी. अंतरावर हर्णे रस्त्यावर मुरूडच्या अलीकडे आहे.
व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवाराच्या सध्या अस्तित्वात असलेल्या वेबसाईटचे
नूतनीकरणाचे काम खूप जोरात सुरु आहे.